नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतून दुचाकी चोरी करणाऱ्या संशयितांनी शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्र्यंबकमधून अटक केली.
संशयिताकडून १ लाखांच्या दोन दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मोहन रामदास ताठे (२९, रा – गणेशगाव, ता. त्रंबकेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. गुन्हेशाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार प्रदिप म्हसदे यांना संशयित ताठे त्रंबकेश्वर परिसरात वाहनासह फिरत असल्याची माहिती मिळाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, हवालदार म्हसदे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाजीमखान पठाण, नाईक प्रशांत मरकड, अंमलदार अमोल कोष्टी यांच्या पथकाने सापळा रचून संशयित ताठे यास ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने शहरातील पंचवटी परिसरातून दोन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तर चोरी केलेल्या दुचाकीपैकी एक दुचाकी मेळा बस स्थानकात तर एक दुचाकी त्रंबकेश्वर येथील माळेगाव परिसरात लपविल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी तपास करीत एक लाख रुपयांच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयिताला पंचवटी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.