कुंभमेळा २०२७: स्वच्छ संकल्प अभियानास त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ

नाशिक। दि. ३ जानेवारी २०२५: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक व पर्यटक भेट देणार आहेत. यासाठी शहर व परिसर स्वच्छ व पर्यावरणपुरक राखण्यासाठी एकत्रित, नियेाजनबद्ध व सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी केले.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासन व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्या संयुक्त नियोजनातून आज त्र्यंबकेश्वर शहरातून स्वच्छ संकल्प अभियानाचा प्रारंभ झाला. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, स्वच्छता संकल्प अभियानास आज शुभारंभ झाला असून यात शासकीय यंत्रणांसह साधु, महंत, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये व नागरिकांचा मोठा सहभाग लाभला आहे. येणाऱ्या काळात सर्वांच्या निस्वार्थ योगदानातून त्र्यबकेश्वर शहर स्वच्छ करावयाचे आहे यासाठी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसह मंदिर संस्थानने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शिर्डी, शनि-शिंगणापूर, सप्तश्रृंगी देवस्थान यांच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता कायम राखण्यासाठी कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे तसेच स्वच्छतेबाबत आवश्यक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना व आवाहन त्यांनी यावेळी केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये बनावट त्वचारोग तज्ज्ञ दाम्पत्यावर गुन्हा; क्लिनिक-अकादमीच्या नावाखाली फसवणूक

कामांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी, नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे आणि समूह आधारित पर्यावरण संवर्धनास सक्षमपणे चालना देवून अविरत सुरू ठेवणे हाच या अभियानाचा उद्देश असल्याचे सांगत आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी सर्व उपस्थितांना स्वच्छतेसाठी माझी वसुंधरा शपथ दिली. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनीही मोहिमेस शुभेच्छा दिल्या.

स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ गौतमी घाट (गायत्री मंदिर) येथून करण्यात आला. यासह शहरातील संगम घाट, वेताळ महाराज मंदिर व परिसर, निवृत्तीनाथ महाराज चौक व परिसर आणि आवाहन आखाडा परिसर या ठिकाणीही स्वच्छता करण्यात आली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' भागांत रविवारी (दि. ४) पाणीपुरवठा बंद राहणार !

या मोहिमेत सर्व ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पंचदशमान जुना आखाड्याचे महंत दिपक गिरीजी महाराज, पंचायती आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती, पंचायती महानिर्वाण आखाड्याचे महंत रमेश गिरीजी महाराज, पंचायती निरंजन आखाड्याचे धनंजय गिरीजी महाराज, पंचायती नया उदासिन आखड्याचे महंत गोपालदासजी महाराज, पंचायती निर्मल आखाड्याचे महंत गुरूवेंद्रशास्त्री महाराज, पंचायती अग्नी आखाड्याचे दुर्गानंद ब्रम्हचारीजी महाराज, रिद्धीनाथ आश्रमातील महंत यांनीही सहभाग नोंदविला.

यासह शहरातील नागरीक, ब्रम्हा व्हॅली महाविद्यालय, स्वदेश फाउंडेशन, संदीप फाउंडेशन, सपकाळ नॉलेज हब, श्री स्वामी सागरानंद सरस्वती आश्रम, वारकरी संघ, श्री विठ्ठल वारकरी गुरूकुल, स्पोर्ट क्लब, महिला बचत गट, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकराज वारकरी शिक्षण संस्था, जनार्दन स्वामी आश्रम वारकरी संप्रदाय, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे विद्यार्थांसह नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते

⚡ हे ही वाचा:  खुनाच्या प्रकरणात दोघांना जन्मठेप; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

स्वच्छता अभियानाची सुरुवात शोभायात्रेने करण्यात आली. गजानन महाराज मंदिर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- लक्ष्मीनारायण चौक- गायत्री मंदिर या मार्गाने टाळ मृदुंगाच्या गजरात स्वच्छतेचा संदेश देत शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा विकास प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, तहसीलदार गणेश जाधव, त्रंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, कुंभमेळा प्राधिकरणाचे तहसीलदार योगेश चंद्रे, मंदार दिवाकर यांच्यासह अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790