यावर्षी वाढणार मोबाइल रिचार्जची किंमत; २०२४ च्या निवडणुकांनंतर होऊ शकते दरवाढ

मुंबई (वृत्तसंस्था): बँक ऑफ अमेरिका (BofA) सिक्‍योरिटीजनं एक रिपोर्ट सादर केला आहे. त्यात दावा करण्यात आला आहे की २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा इलेक्शननंतर भारतातील टेलिकॉम कंपन्या टॅरिफ दरवाढ करू शकतात. ही दरवाढ २० टक्क्यांपर्यंत असू शकते. टॅरिफ वाढवल्यामुळे होणाऱ्या नफ्याचा हवाला देत BofA नं भारती एअरटेलची रेटिंग अंडरपरफॉर्म वरून अपग्रेड करत न्यूट्रल केली आहे.

एका रिपोर्टनुसार, बोफाच्या अ‍ॅनालिस्‍टनी म्हटलं आहे की टॅरिफ मध्ये ह्याआधीची वाढ २ वर्षांपूर्वी डिसेंबर २१ मध्ये झाली होती. आम्ही यावर्षी २०%+ टॅरिफ वाढीची अपेक्षा करत आहोत. ही दरवाढ लोकसभा इलेक्शन नंतर होईल अशी शक्यता आहे आणि टेलीकॉम इंडस्‍ट्री खासकरून वोडाफोन-आयडियाला आपली परिस्थिती सुधारण्यासाठी ही वाढ आवश्यक आहे.

बोफाच्या विश्लेषकांच्या मते टॅरिफ वाढ ग्राहकांना धक्का देऊ शकते. ह्यामुळे भारती एअरटेलचा खास फायदा होईल कारण कंपनीकडे हायअँड युजर्सचा मोठा बेस आहे. रिपोर्ट समोर आल्यानंतर बुधवारी सकाळी भारती एअरटेलचा शेयर १,०६९ रुपयांवर पोहचला होता, जो ५२ आठवड्यांमध्ये सर्वाधीक आहे.

Airtel चे रिचार्ज प्‍लान:
Airtel चे लॉन्ग टर्म प्लॅन्स पाहता, कंपनीकडे अनेक प्रकारचे प्रीपेड पॅक ऑप्शन आहेत. हे प्लॅन दीर्घ व्हॅलिडिटीसह अनलिमिटिड कॉलिंग आणि इंटरनेट डेटा देखील देतात. असाच एक ४५५ रुपयांचा प्‍लान Airtel Thanks App किंवा कंपनीच्या ऑफ‍िशियल वेबसाइटवरून अ‍ॅक्टिव्हेट करता येईल. ह्या प्‍लानवर अनलिमिटिड लोकल, एसटीडी कॉलिंग व्यतिरिक्त रोमिंग कॉल्सची सुविधा देखील आहे. त्याचबरोबर ६जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा देण्यात आलं आहे, जो प्लॅनच्या व्हॅलिडिटी पर्यंत वैध आहे. प्लॅनसह ९०० मोफत एसएमएस आणि मोफत हॅलो ट्यून सब्सक्रिप्शन मिळते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790