एनडीए आणि नेव्हल अकॅडमी (एनए) परीक्षेत भाग घेणा-या उमेदवारांसाठी विशेष रेल्वे गाड्या !

नाशिक (प्रतिनिधी): एनडीएआणि नेव्हल अकॅडमी (एनए) परीक्षेत भाग घेणा-या उमेदवारांसाठी विशेष रेल्वे गाड्या पाठवणार आहेत…! नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) च्या परीक्षांना बसणार्‍या उमेदवारांच्या प्रवासासाठी मध्य रेल्वे पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या चालविणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः

प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.

 १. सोलापूर-मुंबई विशेष  (२ फे-या):
 01254 विशेष सोलापूर येथून दि. ५.९.२०२० रोजी २२.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसर्‍या दिवशी ०६.३५ वाजता पोहोचेल. 

 01253 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि.६.९.२०२० रोजी २२.४५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०६.५० वाजता सोलापूरला पोहोचेल.
थांबे : कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर
संरचनाः १० शयनयान, ३ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ३ द्वितीय श्रेणी.

 २.  पुणे-मुंबई विशेष (२ फे-या):
 01130 विशेष पुणे येथून दि. ५.९.२०२० रोजी २३.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे  पोहोचेल. 

01129 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. ६.९.२०२० रोजी २२.५५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०३.१५ वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे : लोणावळा, कल्याण, दादर.
संरचनाः १५ शयनयान,  ९ द्वितीय श्रेणी.

 ३. अहमदनगर-मुंबई विशेष (२ फे-या) :
 01132 विशेष अहमदनगर येथून दि. ५.९.२०२०२ रोजी २१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसर्‍या दिवशी ०५.३५ वाजता पोहोचेल.  01131 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि.६.९.२०२० रोजी  २०.३५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी अहमदनगर येथे  ०४.४० ​​वाजता पोहोचेल.
थांबे : मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर
संरचनाः  ११ शयनयान, ३ तृतीय वातानुकूलित, ६ द्वितीय श्रेणी.

 ४. नाशिक रोड – मुंबई विशेष (२ फे-या):
01134 स्पेशल नाशिकरोड येथून दि. ५.९.२०२० रोजी २३.४५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला पोहोचेल.  01133 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. ६.९.२०२० रोजी २३.३० ​​वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी नाशिक रोड येथे ०३.१५ वाजता पोहोचेल.
थांबे : इगतपुरी, कल्याण, दादर
संरचनाः १६ द्वितीय आसन  श्रेणी , ३ वातानुकूलित चेअर कार आणि एक द्वितीय श्रेणी.

 ५. भुसावळ – मुंबई विशेष (२ फे-या):
02172 विशेष भुसावळ येथून दि. ५.९.२०२० रोजी २१.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०५.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.  02171 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,  मुंबई येथून ६.९.२०२० रोजी २१.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.३० वाजता भुसावळ येथे  पोहोचेल.
थांबे : जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर
संरचनाः १८ शयनयान,  २ द्वितीय श्रेणी.

६. मुंबई-सावंतवाडी रोड विशेष  (४ फे-या):
01135 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. ४.९.२०२० आणि ६.९.२०२० रोजी २२.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सावंतवाडी रोड येथे सकाळी ०८.१० वाजता पोहोचेल.  01136 विशेष सावंतवाडी रोड येथून दि. ५.९.२०२० आणि ७.९.२०१० वाजता १२.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे त्याच दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.
संरचनाः १३ शयनयान, ४ तृतीय वातानुकूलित,  ७ द्वितीय श्रेणी.

 ७. पुणे-हैदराबाद स्पेशल (२ फे-या): 01155 विशेष पुणे येथून दि. ५.९.२०२० रोजी १४.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता हैदराबाद येथे  पोहोचेल.  01156 विशेष हैदराबाद येथून दि. ६.९.२०२० रोजी २२.४५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १३.१५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे : दौंड, कुर्डूवाडी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, बिदर, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट
संरचनाः १० शयनयान, ४ तृतीय वातानुकूलित, ८ द्वितीय श्रेणी.

 ८. कोल्हापूर-नागपूर विशेष (२ फे-या): 01137 विशेष कोल्हापूर येथून दि. ५.९.२०१० रोजी सकाळी ०८.०५ वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०५.४० वाजता नागपूरला पोहोचेल. 01138 विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० रोजी २०.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १८.३० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल.
थांबे : मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
संरचनाः १८ शयनयान, ६ द्वितीय श्रेणी.

 ९. पुणे-नागपूर विशेष  (२ फे-या): 02159 विशेष पुणे येथून दि. ५.९.२०२० रोजी १६.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०६.१५ वाजता नागपूरला पोहोचेल. 02160 विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० रोजी २०.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ११.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
संरचनाः १८ शयनयान, ६ द्वितीय श्रेणी.

 १०. मुंबई-नागपूर विशेष (२ फे-या): 02161 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि.५.९.२०२० रोजी १७.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०६.०० वाजता नागपूरला पोहोचेल.  02162 विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० रोजी २१.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १०.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे  पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
संरचनाः १६ शयनयान, २ तृतीय वातानुकूलित, २ द्वितीय श्रेणी.

 ११. नाशिक रोड-नागपूर विशेष  (२ फे-या): 01263 विशेष नाशिक रोड येथून दि. ५.९.२०२० रोजी १६.१० वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०३.०० वाजता नागपूरला पोहोचेल. 01264 विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० रोजी २१.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०७.३० वाजता नाशिकरोडला पोहोचेल.
थांबे : मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
संरचनाः १६ शयनयान, ६ द्वितीय श्रेणी.

१२. अमरावती- नागपूर मेमू विशेष (२ ट्रिप): 01139 मेमू विशेष अमरावती येथून दि. ६.९.२०२० रोजी ००.१५  वाजता  (५/६.९.२०२० च्या मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी ०५.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. 01140 मेमू विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० ला २३.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०४.०० वाजता अमरावतीला पोहोचेल.
थांबा : वर्धा.
संरचना: ८ मेमू डब्बे

 १३. जळगाव – नागपूर मेमू स्पेशल (२ फे-या): 02165 मेमू विशेष जळगाव येथून दि. ५.९.२०२० रोजी २१.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.२० वाजता नागपूरला पोहोचेल. 02166 मेमु विशेष नागपूरहून दि. ६.९.२०२० रोजी २२.४५ वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०४.२० ​​वाजता जळगावला पोहोचेल.
थांबे : भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
संरचना : ८ मेमू डब्बे

 १४. अकोला-नागपूर मेमू विशेष (२ फे-या) : 01141 मेमु विशेष अकोला येथून दि. ६.९.२०२० रोजी ००.३० वाजता  (५/६.९.२०२० च्या मध्यरात्री) सुटेल व त्याच दिवशी सकाळी ०५.०० वाजता नागपूरला पोहोचेल. 01142 मेमु विशेष नागपूरहून  दि. ६.९.२०२० रोजी २०.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी अकोला येथे २३.५५ वाजता पोहोचेल.
थांबे : बडनेरा, वर्धा.
संरचना: ८ मेमू डब्बे.

१५. अहमदनगर- नागपूर विशेष (२ फे-या) : 02167 विशेष अहमदनगर येथून दि. ५.९.२०२० रोजी १६.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता नागपूरला पोहोचेल. 02168 विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० रोजी २२.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी १०.४० वाजता अहमदनगरला पोहोचेल.
थांबे : बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
संरचनाः १८ शयनयान, ४ द्वितीय श्रेणी.

१६. पनवेल-नागपूर विशेष  (२ फे-या): 02169 विशेष पनवेल येथून दि. ५.९.२०२० रोजी १३.५० वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. 02170 विशेष नागपूरहून दि. ६.९.२०२० रोजी २२.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १२.०० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
संरचनाः १३ शयनयान, ४ तृतीय वातानुकूलित, ५ द्वितीय श्रेणी.

 १७. बल्हारशाह – नागपूर मेमू विशेष  (२ फे-या): 01143 मेमु विशेष बल्हारशाह येथून दि. ६.९.२०२० (मध्यरात्री  ५/६.९.२०२०) रोजी ००.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ०४.४५ वाजता नागपूरला पोहोचेल. 01144 मेमु विशेष नागपूर येथून ६.९.२०२० रोजी २३.१५ वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता बल्हारशाहला पोहोचेल.
थांबे : चंद्रपूर, सेवाग्राम
संरचना : ८ मेमू डब्बे

 १८. पुणे-अहमदाबाद स्पेशल (२ फे-या): 01145 विशेष  दि. ५.९.२०२० रोजी १७.३० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०५.४५ वाजता अहमदाबादला पोहोचेल. 01146 विशेष अहमदाबाद येथून दि. ६.९.२०२० रोजी २०.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०८.०० वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे : लोणावळा, कल्याण, वसई रोड, सूरत, वडोदरा
संरचनाः १८ शयनयान  २ द्वितीय श्रेणी.

 १९. मुंबई- मडगाव विशेष मार्गे पुणे-मिरज (२ फे-या):  01147 विशेष  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. ५.९.२०२० रोजी ११.०५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता मडगावला पोहोचेल. 01148 विशेष मडगाव येथून ६.९.२०२० रोजी २०.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १३.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, लोंडा.
संरचनाः १८ शयनयान, २द्वितीय श्रेणी.

 20. कोल्हापूर – मडगाव विशेष  (2 फे-या): 01149 विशेष कोल्हापूर येथून दि. ५.९.२०२० रोजी १९.३० वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०४.३० वाजता मडगावला पोहोचेल. 01150 विशेष मडगाव येथून दि. ६.९.२०२० रोजी २०.३० वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०५.३० वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
थांबे : मिरज, बेळगावी, लोंडा.
संरचनाः ७ शयनयान,  २ द्वितीय आसन श्रेणी,१५ द्वितीय श्रेणी

 २१. कोल्हापूर- धारवाड विशेष  (२ फे-या):  01151 विशेष कोल्हापूर येथून दि.५.९.२०२० रोजी २२.०० वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०४.५० वाजता धारवाडला पोहोचेल. 01152 विशेष धारवाड दि. ६.९.२०२० रोजी २१.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
थांबे : मिरज, बेळगावी, लोंडा.
संरचनाः २२ शयनयान, २ द्वितीय श्रेणी.

२२. पुणे- धारवाड विशेष (२ फे-या)

 01153 विशेष पुणे येथून दि. ५.९.२०२० रोजी १७.०५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०५.५० वाजता धारवाडला पोहोचेल. 01154 विशेष धारवाड येथून दि.  ६.९.२०२० रोजी २०.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०७.५० वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे : सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, लोंडा.
संरचनाः १५ शयनयान, ७ द्वितीय श्रेणी.

 २३. मुंबई- हैदराबाद विशेष (2 फे-या): 01157 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस  दि. ५.९.२०२० रोजी १४.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०५.१५ वाजता हैदराबादला पोहोचेल.  01158 विशेष हैदराबाद येथून दि. ६.९.२०२० रोजी २१.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ११.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे : ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलाबुरागी, वाडी, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट
संरचनाः १२ शयनयान, ३ तृतीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ३ द्वितीय श्रेणी.

आरक्षणः मध्य रेल्वेतून सुटणार्‍या  पूर्णपणे राखीव असलेल्या विशेष गाड्यांचे बुकिंग (मेमू विशेष  वगळता) सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झालेले आहे.

टीपः कोल्हापूर – श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790