Breaking: विशेष सरकारी वकील मिसर यांच्या वाहनाला अपघात; थोडक्यात बचावले

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील अनेक संवेदनशिल खटल्यांमध्ये सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला बुधवारी (ता. ११) अपघात घडला.

श्रीरामपूरवरून कामकाज आटोपून समृदधी महामार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना भरवीर फाट्यावर सदरचा अपघात घडला.

ॲड. मिसर यांच्या ताफ्यात बाहेर वाहन घुसल्याने अपघात घडला असून, यात ॲड मिसर यांच्यासह तिघे थोडक्यात बचावले आहेत.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

मिळालेल्या माहितीनुसार, विशेष सरकारी वकील अजय मिसर हे न्यायालयीन कामकाजानिमित्ताने श्रीरामपूर येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर त्यांचा ताफा समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने निघाला होता.

ॲड. मिसर यांच्याकडे अनेक संवेदनशिल खटल्याचे कामकाज पहात असल्याने त्यांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. पायलट वाहन आणि एस्कॉर्ट वाहनाच्यामध्ये ॲड. मिसर यांचे सफारी चारचाकी वाहन (एमएच ०१ सीपी १६१८) जात होेते.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

समृद्धी महामार्गावरील भरवीर फाट्यानजिक त्यांच्या पायलट वाहन आणि ॲड. मिसर यांच्या वाहनाच्या मधे खासगी वाहन घुसल्याने सदरचा अपघात घडला. यावेळी ॲड. मिसर यांच्या वाहनाच्या चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.

या वाहनात ॲड. मिसर यांच्यासह चालक व त्यांचा सहकारी वकील होते. यात त्यांच्या वाहनाची (एमएच ०१ सीपी १६१८) समोरील बाजुचे मोठे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

तर, ॲड. मिसर यांच्या खांद्यासह चेहर्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचार करून ॲड. मिसर दुसर्या वाहनाने नाशिकला परत येत असल्याची माहिती त्यांचे सहकारी ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790