नाशिक, दि. 2 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): शांघाई (चीन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवरून स्पर्धा घेतली जाणार असून त्यातून कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. विविध 63 क्षेत्रामध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील वय वर्षे 23 वर्षाखालील तरूण व तरूणींसाठी त्यांच्यातील कौशल्य दाखविण्याची संधी आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 50 क्षेत्रांकरिता उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 2004 किंवा त्यानंतरचा असावा.
डिजिटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कंप्युटिंग, सायबर सिक्युरिटी, आयसीटी नेटवर्क, इन्फ्रास्ट्रक्चर, आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री4.0, मेकॅट्रॉनिक्स, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नोलॉजी, रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन, वॉटर टेक्नॉलॉजी, डेन्टल प्रोस्थेटिक्स, एअरक्राफ्ट मेन्टेनन्स या क्षेत्रासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2001 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेसाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, एमएसएमइ टुलरूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, आयएचएम/ हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इन्सिट्यूट, स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीइटी, खासगी कौशल्य विद्यापीठ, फाईन आर्टस् महाविद्यालये, प्लावर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिनस्थ सर्व व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने यांच्याकडील विहित वयोमर्यादेतील इच्छुक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
![]()

