सातपूर-अंबड लिंक रोडवर झालेल्या अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. सातपूर-अंबड लिंक रोडवर आज सकाळी झालेल्या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर झाले आहेत.

ज्योती फार्म समोर तीन शाळकरी मुले मोटरसायकलने क्लासला जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या अपघातात सार्थक दामू राहाणे हा जागीच ठार झाला तर त्याचे दोन मित्र योगेश आणि भावेश हे गंभीर जखमी झाले.

हे ही वाचा:  पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करून महिलेची फसवणूक...

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडे सहा वाजता हा अपघात झाला. अंबड लिंक रोडवरील जाधव संकुल मधील राहणारे योगेश  व भावेश या दोन्ही भावांचा मित्र सार्थक दामू राहाणे हे तिन्ही मोटरसायकलवरून सातपूर कॉलनीत क्लासला जात होते.

हे ही वाचा:  नाशिक: थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ

एम्पायर हॉटेल समोर अज्ञात वाहानाने मोटारसायकलला कट मारला. त्यामुळे मोटरसायकल दुभाजकावर धडकली. यात सार्थक राहाणे हा जागीच ठार झाला तर योगेश व भावेश हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये पहिली शिफ्टसाठी जाणाऱ्या कामगारांनी हा अपघात पाहिला. त्यांनी त्वरीत धाव घेत मदतकार्य केले. तसेच पोलिसांना कळवले. सातपूर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790