Monsoon Update : मान्सूनची जोरदार बॅटिंग, उद्या महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट; या भागांना अतिवृष्टीचा इशारा

राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्रात सर्वत्र दाखल झाला आहे. गेल्या २ दिवसांमध्ये मान्सूने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच हवामान खात्याकडून मान्सूनसंदर्भात महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहेत.

२७ जून रोजी म्हणजेच मंगळवारी राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याच्या अंदानुसार, पुढच्या २४ तासांमध्ये नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्येदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा आहे.

हे ही वाचा:  नाशिक: तोतया आयपीएस मिश्रावर अजून एक फसवणुकीचा गुन्हा दाखल; ३६ लाखांना घातला गंडा...

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, २९ आणि ३० जूनला महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल. पण यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

२७ जूनला कशी असेल पावसाची स्थिती ?:
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ जून रोजी राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.

हे ही वाचा:  हे काय नवीन! व्हॉट्सअ‍ॅपने बंद केले ८५ लाख भारतीय अकाउंट्स, नेमकं प्रकरण काय?

२८ जूनला विदर्भात पावसाचा जोर कमी:
हवामान विभागानं जारी केलेल्या अ‍ॅलर्टनुसार २८ जूनला पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील. या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूरला यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस होऊ शकतो.

हे ही वाचा:  नाशिक: चॉपर घेवुन दहशत निर्माण करणारा रेकॉर्ड वरील आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी !

दरम्यान, भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार तासात मुंबई, रायगडमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय ठाणे, पुणे, पालघर, अहमदगनर, सोलापूर, सातारा, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस होऊ शकतो. याशिवाय वारे देखील वेगात वाहू शकतात.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790