नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य हा त्याचं जीवनच जगण हरपला आहे. मानवा तू आता तरी भानावर ये, मानवी जन्मी आला तर माणसा सारख जगुन बघ असे म्हणत निरंकारी माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने गोविंद नगर येथे झालेल्या बाल समागम मध्ये लहान मुलांनी अवतार वाणी, हरदेव वाणी, अभंग, गीत, कविता, कव्वाली, अन नाटकाच्या माध्यमातून या मानवाला जगण्याचे संदेश दिला.
या सेक्टर लेवलच्या बाल समागममध्ये गोविंद नगर, पंचवटी, सातपूर, जेलरोड, तसेच बाहेरील ब्रांच सिन्नर, निफाड, दिंडोरी, घोटी, शेरेवाडी, ओझर, देवळाली कॅम्प आदी ठिकाणाहून सुमारे १८० बालकांनी सहभाग घेतला होता. यासाठी मुलांनी अनेक दिवसांपासून तयारी केली होती. मुलांनी सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमातून लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही निरंकारी मिशनची तत्त्वे, गुरुमत आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याची माहिती मिळाली.
यावेळी आयोजित सेक्टर लेवल बाल समागमच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञान प्रचारक कन्हैयालाल डेबरा उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रेम, नम्रता, करुणा, दया, सहिष्णुता अंगीकारणे आणि मानवतेच्या मार्गावर चालणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. असा संदेश लहान मुलांनी अनेक भाषांच्या मदतीने दिला आहे.
हे गुण अंगीकारण्यासाठी वयाचा काही संबंध नाही. त्यांचे वय ही कमी होते पण त्यांनी विविध रूपात दिलेले संदेश हे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी दिलेल्या शिकवणुकीने परिपूर्ण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकचे सेक्टर संयोजक गुलाब पंजवाणी यांनी निरंकारी मिशनच्या उपक्रमांची माहिती दिली. सर्व भागातून आलेले मुखी व उपस्थित भाविक भक्तांचे आभार मानले. यावेळी संत निरंकारी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.