नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
खासदार संजय राऊत यांचा दावा: बावनकुळे यांचा तो फोटो भाजपाकडूनच मिळाला
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सलीम कुत्ता बरोबरचा ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा व्हिडीओ हा केवळ अपघात आहे.
असे गुन्हेगारांशी संबंध शोधायचे तर संपूर्ण देशातील भाजपाच खाली होईल, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील फोटो-व्हिडीओ हा भाजपाच्या गोटातूनच मिळाला असल्याचे सांगत आपण बावनकुळे यांना संबंधिताचे नावही सांगू, असेही ते म्हणाले, खासदार संजय राऊत यांचे शनिवारी (दि.२३) नाशिकमध्ये आगमन झाले. यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
सुधाकर बडगुजर यांच्या कथित गुन्हेगारीशी संबंध प्रकरणात बोलताना त्यांनी बडगुजर यांची चौकशी सुरू आहे. ते चौकशीला सामोरे देखील जात आहेत. शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला. आता भाजपातील छोटी भाभी वही भाभी आणि ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे कोणाशी सबंध आले त्याची माहिती आम्ही पोलिसात देऊ, असेही राऊत म्हणाले.
भाजपातील अनेकांचे गुन्हेगारांशी संबंध आहेत. त्यांची चौकशी करायची तर संपूर्ण भाजपाच रिकामा होऊन जाईल. मात्र, सलीम कुत्ता भाजपात आला तर तो निर्दोष ठरू शकतो. कारण भाजपाकडे वॉशिंग मशीन आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊतील फोटो सुधाकर बडगुजर यांच्या मुलानेच काढल्याचा इन्कार त्यांनी केला. आणि भाजपातील एकानेच आपल्याकडे असे अनेक व्हिडीओ दिले आहेत मात्र, आमच्याकडे माणुसकी शिल्लक असल्याने आम्ही सर्व सांगत नाही. मात्र, हे फोटो व्हिडीओ कोणी दिले, त्याचे नाव मी बावनकुळे यांना आवर्जून सांगेन, असेही ते म्हणाले.
ललित पाटीलकडून मालेगावी हप्ते:
बडगुजर हे निर्दोष असल्याचे सांगताना ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्याकडून मालेगावी कोणाच्या घरी हप्ते जात होते, तसेच छोटी भाभी-बड़ी भाभी कोण याबाबत आम्हीही पोलिसांना मााहिती देऊ, असेही संजय राऊत म्हणाले.