रिलायन्स जिओने त्यांच्या अनेक अमर्यादित प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये बदल केले आहेत. जिओने केलेले हे बदल 3 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत. याशिवाय स्मार्टफोन युजर्सच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी रिलायन्स जिओने जिओ सेफ सेवा सुरू केली आहे. तसचे कंपनीने एआय पॉवर्ड जिओ ट्रान्सलेट सेवा देखील सुरू केली आहे.
असे असले तरी युजर्सच्या दृष्टीने एक वाईत बातमी अशी की, जिओने आता सर्व युजर्सना अमर्यादित 5G डेटा देणे बंद केले आहे. आता अमर्यादित 5G सेवा फक्त निवडक प्लॅन्सवरच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने बुधवारी सांगितले की, त्यांनी सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स 15 ते 25 टक्क्यांनी महाग केल्या आहेत. हे नवीन प्लॅन्स 3 जुलैपासून लागू होतील.
जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन 155 रुपयांचा होता, ज्याची किंमत 189 रुपये करण्यात आली आहे. जिओने आपल्या सर्व मासिक, तीन महिन्यांच्या आणि वार्षिक प्लॅन्सचे दर वाढवले आहेत. याशिवाय पोस्टपेड प्लॅनच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
केवळ ‘या’ युजर्सना मिळणार अमर्यादित 5G डेटा:
याशिवाय जिओने सरसकट अमर्यादित 5G डेटा देणेही बंद केले आहे. आता हा लाभ फक्त 2GB प्रति दिन किंवा त्याहून अधिक प्लॅन घेणाऱ्या युजर्सना मिळेल. म्हणजेच ज्या यूजर्सनी 299, 349, 399, 533, 719, 999 आणि 2999 रुपयांचे प्लॅन घेतले आहेत त्यांनाच अमर्यादित 5G डेटाचा लाभ मिळेल.
क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्पेक्ट्रम लिलावानंतर लगेचच ही वाढ करण्यात आली आहे. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया देखील लवकरच त्यांच्या मोबाईल सेवांचे दर वाढवू शकतात. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी निवेदनात म्हटले आहे की, “नवीन प्लॅन्स लाँच करणे हे 5G आणि AI तंत्रज्ञानातील गुंतवणुकीद्वारे उद्योगातील नावीन्य आणि हरित वाढीच्या दिशेने एक पाऊल आहे
![]()

