नाशिक। दि. ३ ऑगस्ट २०२५: धान्य शिधापत्रिकाधारकांना मोफत मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत जिल्ह्यातील सुमारे १५.८१% लाभार्थी अद्यापही ई-केवायसी पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या रेशनवरील धान्य मिळवण्याबाबत मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आता ५ ऑगस्टपर्यंत दुकानदारांना शिल्लक नागरिकांची ई-केवायसी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय, ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढीची शक्यता वर्तवली जात असल्याने, या सुमारे १६% गरीब नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शासनाने दिलेल्या ३१ जुलैच्या मुदतीत जिल्ह्यातील ८४.१९% नागरिकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुरुवातीला, ज्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांनाच धान्य दिले जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु, शिल्लक राहिलेले लाभार्थीही गरीब असल्याने, शासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेत ५ ऑगस्टपर्यंत यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील ई-केवायसी प्रक्रियेचे एकूण लक्ष्य ३८,६१, २६९ आहे. सद्यस्थितीत २०, २०, ३१३ नागरिकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर १२, २६,६३९ नागरिकांची ई-केवायसी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचप्रमाणे, ६,१४,१५५ नागरिकांची अद्याप ई-केवायसी झालेली नाही.
राज्यात २५% लाभार्थीचे ई-केवायसी बाकी:
राज्यातही हेच प्रमाण कायम असून, राज्यात सुमारे २५% नागरिकांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे. त्यामुळे, मुदतवाढ देण्यासह त्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790