नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एमडीची विक्री व निर्मितीचे रॅकेट चालविणाऱ्या मुख्य सूत्रधार ललित पाटीलची नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून पोलिस कोठडीत त्याची चौकशी केली असता त्याने दर महिन्याला एकाचवेळी ७ दिवस कारखाना रात्रंदिवस चालू ठेवून एमडीची निर्मिती केली जात होती.
उर्वरित दिवस कारखाना बंद करून पूर्णपणे स्वच्छ करून विक्रीसाठी लक्ष दिले जात असल्याची कबुलीच ललितने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच सुरुवातीला ३ ते ४ लाख रुपये किलोने एमडी विक्री करून नंतर दर वाढविण्यात आल्याची धक्कादायक बाबही त्याने सांगितली.
शिंदे गावातील एमडी प्रकरणात संशयित ललितसह रोहित चौधरी, हरिष पंत, जिशान शेख हे अमलीपदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात आहेत. ललितच्या सांगण्यावरून भूषण पाटील, अभिषेक बलकवडे व जिशान हे कारखान्यात एमडी तयार करत होते.
एमडीची मागणी आल्यानंतर महिन्यातून एकदाच निर्मिती करण्यात येत होती. तयार माल दोन संशयितांमार्फत मुंबईसह इतरत्र एमडी वितरीत केले जात होते. त्यासाठी तीन लाख रुपये प्रतिकिलो दराने एमडीची विक्री ललितने केली. पैसे मिळाल्यावर रसायन व कच्चा माल खरेदी करून पुन्हाएमडी तयार केले जात होते, असे पोलीस चौकशीत समोर आले आहे.
तसेच, १० ते १५ किलोएमडी मुंबईतील खरेदीदारांनी नाकारल्याने तोही मालपडून राहिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याचप्रकरणात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसारललितच्या आणखी दोघा साथीदारांना पथक ताब्यात घेणार असून त्यांचीही चौकशी करणार आहे.
संशयित भूषण पानपाटील व अभिषेक बलकवडे यांची बुधवारी (दि. १३) पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले. या दोघा संशयितांना पथकाने पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता कारागृहात रवानगी केली. सामनगाव एमडी तस्करीत अटक केलेला उमेश वाघ याला २२ डिसेंबरपर्यंत मोक्कांतर्गत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.