नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात पेट्रोलच्या दरांनी आजपर्यंतच्या तुलनेत विक्रमी पातळी गाठली आहे. पेट्रोलचे दर ९३.३५ रुपये प्रति लिटरच्या जवळपास तर डिझेलचे दर ८२.४८ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. त्यामुळे लवकरच पेट्रोलचे दर शंभरी गाठतात की काय अशी चिंता वाहनचालकांना भेडसावते आहे. मात्र यावर अद्यापही कुठल्याही राजकीय पक्षाने सामन्यांचा बाजूने भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.
हे दर दररोज आवाक््याच्या बाहेर वाढत असल्याने मालवाहतूक, प्रवासी वाहतूक महागणार असून किराणा, भाजीपाला, दूध, धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलचे दर अशाच पद्धतीने वाढत राहिले तर दुचाकी वाहनधारकांचा इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याकडे कल वाढत जाईल !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790