नाशिक: डा‍क विभागाची 1 जुलै रोजी पेन्शन अदालत; निवृत्तीवेतन धारकांनी 25 जूनपर्यंत करावेत अर्ज

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी डाक कार्यालयात 1 जुलै, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पेन्शन व परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींनी विहित नमुन्यातील आपले अर्ज 25 जून 2024 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे नाशिक डाकघर विभागाचे वरिष्‍ठ प्रवर अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

हे ही वाचा:  उत्तर महाराष्ट्रात २ दिवस मध्यम पावसाची शक्यता

या पेन्शन अदालतीमध्ये कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टी.बी.ओ.पी/एम.ए.सी.पी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे, धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या तसेच डी पी सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही, असे पत्रकात नमूद केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बंद बंगला, व रो हाऊसचे लॉक तोडून घरफोडी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास

त्याचप्रमाणे 25 जून 2024 या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालत मध्ये अंतर्भाव केला जाणार नाही. अर्जाचा विहित नमुना टपाल कार्यालयात उपलब्ध असून संबंधितांनी मुदतीत आपले निवृत्ती वेतनासंबंधित तक्रारी अर्ज प्रवर अधिक्षक डाक घर, नाशिक विभाग, जी. पी. ओ आवार, नाशिक -422001 या पत्त्यावर वेळेत सादर करावेत, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790