नाशिक: प्रवाशांना सिटी लिंकचा पास ९ ते ५ या वेळेतच मिळणार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): दिवाळीनिमित्त ६ ते १८ नोव्हेंबर या दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये महापालिकेच्या सिटी लिंक बससेवेचा पास उपलब्ध राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त 15 मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन

सध्या शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्ट्या लागल्या आहेत. परिणामी पास काढणाऱ्या प्रवासी संख्येत देखील घट झाल्याने पास केंद्राच्या वेळेत अंशतः बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेतच पास केंद्र सुरू राहतील.

मुख्य म्हणजे हा वेळेतील बदल केवळ ६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीसाठी करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवाशांनी दिलेल्या वेळेतच पास काढायला जावे असे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत महत्वाची अपडेट…

सद्यस्थितीत सिटी लिंक मुख्यालय, निमाणी बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानक या ३ ठिकाणी पास केंद्र सुरू असून या सर्व ठिकाणी हा निर्णय लागू असेल. तसेच १९ नोव्हेंबरपासून पास केंद्र पूर्ववत सुरू राहातील याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी असे सिटी लिंक व्यवस्थापनाने कळवले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790