नाशिक: कांदा व्यापाऱ्याला 15 लाखांचा गंडा; खरेदी करूनही रक्कम न दिल्याने गुन्हा दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): चांदवड येथील कांदा व्यापाऱ्याकडून जून २०१९ पासून ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत वेळोवेळी १४ लाख ७१ हजार १०८ रुपयांचा कांदा खरेदी करून हरियानाच्या व्यापाऱ्याने रक्कम दिलेली नाही.

या फसवणूक प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत नमन गौतमकुमार डोंगरवाल (रा. चांदवड) या व्यापाऱ्याकडून पंडित अतुल शर्मा (खांडसा रोड, सब्जी मंडी, गुरुग्राम, गुडगाव, हरियाना) या व्यापाऱ्याने १४ लाख ७१ हजार १०८ रुपयांचा कांदा खरेदी केला.

नमन डोंगरवाल व त्यांचे बंधू या व्यापाऱ्याकडे पैशाची मागणी करीत होते. मात्र, पंडित शर्मा याने पैसे देण्यास टाळाटाळ केली व डोंगरवाल बंधूंना शिवीगाळ केल्याची तक्रार नमन डोंगरवाल यांनी दिली होती. त्यानुसार चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790