नाशिक (प्रतिनिधी): अत्यावश्यक सोयी पुरवतांना अनेकांना अडचण येत आहेत. पण आता लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यातील १५ प्रकारच्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा-सुविधांना परवानगी देण्यात आली आहे. या सेवा-सुविधांमधील उद्योग आस्थापनांनी आपल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या ई-पासेससाठी जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://nashik.gov.in वरील ‘कोविड-१९’ (Covid-19) या पोर्टलवर रितसर ऑनलाईन अर्ज करावेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.
लॉकडाउऊनच्या कालावधीत खालील अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास शासनाने जिल्हा प्रशासनास कळविले आहे. त्यात,
- सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा
- शेती व त्यासंबंधीत उपक्रम व सेवा
- वित्तीय सेवा
- सामाजिक स्वरूपाच्या सेवा
- ऑनलाईन व डिस्टन्स एज्युकेशन
- मनरेगाची कामे
- सार्वजनिक उपयोगितेची कामे
- राज्यांतर्ग व बाहेर मालवाहतुक
- जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा
- वाणिज्य व खाजगी आस्थापना
- सरकारी व खाजगी उद्योग
- अनुज्ञेय बांधकामे
- आपत्कालीन वाहतुक
- भारत सरकारची व अधिनस्त, स्वायत्त व दुय्यम कार्यालये
- राज्य शासनाची स्वायत्त तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये
या १५ प्रकारच्या सेवा-सुविधांचा समावेश आहे. सुरू ठेवण्यास त्यासाठी लागणारा आ-पास देण्यासाठी https://nashik.gov.in/ यावर सोय करण्यात आली असून संबंधीत यंत्रणांनी या संकतस्थळाला भेट देवून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. या सर्व अर्जांची रितसर ऑनलाईन पडताळणी करून ई-पास वितरित केले जातील असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.