Amazon

नाशिक: मतदार यादीवरील दावे-हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नाशिक। दि. १३ ऑक्टोबर २०२६: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दिनांक १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यानुसार, आता मतदारांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला गती- आयुक्त शेखर सिंह

आयोगाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, दावे व हरकती दाखल करण्यासाठीची मुदत १२ ऑक्टोबरऐवजी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६.
दावे व हरकतींवरील नोटीस प्रक्रिया व निकाली काढण्याचा कालावधी : ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६.
मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी : १६ नोव्हेंबर २०२६.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जुन्या वादातून दोघांना मारहाण; सोन्याची चेन आणि रोकड लुटल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक

मतदार यादीतील नोंदींबाबत दावे किंवा हरकती असल्यास संबंधित मतदारांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790