उत्तर महाराष्ट्रात २ दिवस मध्यम पावसाची शक्यता

नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील कोकण आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाचा जोर आहे. त्यामुळे हाताशी आलेल्या खरिपाच्या पिकांचे तसेच द्राक्ष आणि फळबागांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. आणखी दोन दिवस म्हणजे २३ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

२४ ऑक्टोबरपासून बहुतांश भागात उघडीप मिळेल. मात्र २६ ते २९ दरम्यान दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाचा अंदाज आहे. आणखी दोन दिवस राज्यात अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

23 रोजीच्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम नाही:
२३ ऑक्टोबरला चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे अचानक हवामान बदल व पावसाचा धोका नसल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790