
नाशिक (प्रतिनिधी): सातपुर पाणी पुरवठा विभागातील 1000 मी.मी. व्यासाची डी.आय. पाईपलाईन काकड मळा, डीपी रोड येथे अचानक गळती सुरु झालेली आहे. सदरील पाणी गळतीमुळे पाणी वाया जात असुन नागरीकांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. तरी विषयाधिन पाईप लाईनची दुरुस्ती शनिवार दिनांक 29/05/2021 रोजी सकाळी 9 वाजे पासुन हाती घ्यावयाचे आहे.
त्यामुळे शनिवार दि. 29/05/2021 रोजीचा प्र.क्र. 26 मध्ये खालील ठिकाणी दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. म्हाडा कॉलनी, गोदावरी नगर, पाटील पार्क, जाधव संकुल, (खालचे व वरचे) मेदगे नगर, आशीर्वाद नगर, बंदावणे मळे परिसर, रिगालिया टॉवर इत्यादी परिसरात दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तरी याची नागरिकांनी नोंद घ्यावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

