नाशिक (प्रतिनिधी): संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांचे नाशिकमध्ये रविवारी (दि. ४) आगमन होत आहे.
शहरातील तपोवनातील साधुग्राम येथील मोदी मैदान येथे सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत एकदिवसीय संतसमागमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरू असून रविवारी जिल्हाभरातून भाविक कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत. सकाळी १० पासून येथे कॅन्टींग, लंगर, प्रकाशन या सुविधा सुरू असेल. या कार्यक्रमात, सद्गुरू माताजी यांचे प्रवचन होणार आहे.
संत निरंकारी मिशनचा महाराष्ट्र समागम नुकताच नागपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. समागमनंतर लगेचच माता सुदीक्षाजी महाराज या नाशिकमध्ये येत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सत्संग सोहळ्याला उपस्थित राहून दिव्य दर्शन व प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत निरंकारी मंडळ, नाशिक परिक्षेत्राचे प्रमुख जनार्दन पाटील व सेक्टर संयोजक गुलाब पंजवाणी यांनी केले आहे.