नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक(प्रतिनिधी): आयकर विभागाकडून सलग दुसऱ्या दिवशी शहरातील आठ शासकीय कंत्राटदारांचे घर, कार्यालय तसेच त्यांच्या कंपन्यांत छापेमारी सुरु होती.
कंत्राटदारांच्या कंपन्यांचे बँक खाते तसेच खासगी लॉकरही तपासण्यात आले. कागदपत्र व रोकडबाबत कसून चौकशी सुरु आहे. कर्माचाऱ्यांचे जबाबही घेण्यात येत आहेत.
कंत्राटदारांच्या संपर्कातील सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांचीही नावे समोर आली असून चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजी- माजी लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर मोठी टक्केवारी देत कामे घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. कंत्राटदारांनी कामे डमी कंपन्यांना दिल्याचे तपासात समोर आले आहे. या कंपन्या नातेवाईकांच्या नावावर असल्याने आयकर विभागाने या नातेवाईकांचीही चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.