नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली कार्यक्रम स्थळांची केली पाहणी !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे येथील पोलीस कवायत मैदानावर आगमन झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत असलेल्या तपोवन मैदानावरील सर्व कार्यक्रम स्थळांची पाहणी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आधारभूत दरानुसार होणार चना खरेदी; शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत नोदंणीची संधी

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलगिरी बाग येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडची पाहणी करून समाधान व्यक्त केले. रोड शो चा परिसर व मुख्य कार्यक्रम मंचची पाहणी करून आयोजनात कोणत्याही उणिवा राहणार नाही याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. तसेच यावेळी श्री शिंदे यांनी श्री  काळाराम मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले. गोदावरी नदी व शहर सुशोभीकरण कामाची पाहणी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790