नाशिक। दि. ६ जानेवारी २०२६: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील १२१ शिक्षणक्रमांच्या हिवाळी परीक्षांचे आयोजन बुधवार, दिनांक ७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.
राज्यभरातील २६९ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होणार असून, सुमारे १,४९,८७२ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेत विविध विषयांतील एकूण ६,७९,९५४ उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ग ‘क’ परीक्षा रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी तसेच महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे दिनांक १४, १५ व १६ जानेवारी २०२६ रोजी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा आयोजनाबाबतच्या सर्व सूचना परीक्षा केंद्रांना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आली आहे.
![]()


