नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबईस्थीत शहरातील एका महिलेस तब्बल सव्वा नऊ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली. भरघोस मोबदल्याचे आमिष दाखवत टास्कच्या नावाखाली सायबर भामट्यांनी हा गंडा घातला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईस्थित एक महिला महिला सध्या नाशकात असून ती गुरूवार (दि.२) सोशल मिडीयाच्या माध्यमातून घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना टेलीग्रामच्या माध्यमातून भामट्यांनी तिच्याशी संपर्क साधला होता.
यावेळी गुंतवणुकीवर तात्काळ मोबदल्याचे आमिष दाखविण्यात आल्याने महिलेस वेगवेगळया टास्कसाठी सुमारे ९ लाख २८ हजार ५२० रूपयांची गुंतवणुक केली. मात्र टास्कचे टप्पे पूर्ण करूनही गुंतवणुकीच्या रकमेसह मोबदला न मिळाल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक प्रविण चव्हाण करीत आहेत.