नाशिकचे तापमान 12.6 अंशांवर; दुपारनंतर वाढ

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह परिसरात सायंकाळनंतर गारठा वाढत आहे. दिवसाच्या सुरवातीला पारा काही अंशांनी वाढून दुपारी सामान्‍य स्‍थिती होत असल्‍याचा अनोखा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. आज (दि. २६ डिसेंबर) किमान तापमान १२.६ इतके नोंदविले गेले.

तर काल पाऱ्यात पुन्‍हा एकदा घसरण होऊन किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. मात्र दिवसाच्‍या प्रखर सूर्यकिरणांमुळे कमाल तापमानात वाढ नोंदविली असून, सोमवारी (ता. २५) हे तापमान ३१.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

यंदाच्‍या हिवाळी हंगामात कधी गारठा तर कधी सामान्‍य वातावरण, अशी अनुभूती येते आहे. गेल्‍या १६ डिसेंबरला पारा घसरून यंदाच्‍या हंगामातील नीचांकी किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: राष्ट्रीय लोक अदालतीत 13 हजार 204 प्रकरणे निकाली; तब्बल 123 कोटींवर तडजोड शुल्क वसूल !

यानंतर मात्र पारा वाढत गेल्‍याने गेल्‍या दहा दिवसांपासून सरासरी किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्‍या जवळपास राहात होते. दुसरीकडे कमाल तापमानातही मोठी तफावत बघायला मिळत होती. सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत असल्‍याने किमान तापमानात घट, तर दुपारी प्रखर सूर्यकिरणांमुळे कमाल तापमानात वाढ नोंदविली गेली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

जळगाव पुन्‍हा थंड:
उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालीचा गारठा जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी जळगावचे किमान तापमान राज्‍यात नीचांकी राहिले होते. सोमवारीदेखील जळगावचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, ते राज्‍यातील नीचांकी किमान तापमान ठरले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790