नाशिक: तापमानात २४ तासांत एका अंशाने वाढ

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या २४ तासांत शहराचे तापमान १ अंशाने वाढून ३७.६ अंश सेल्सिअस झाले. तर किमान तापमान १७.८ अंशांवर होते. दिवसा प्रचंड ऊन आणि हवामान कोरडे असल्याने उकाड्‌याने नागरिक हैराण झाले होते. राज्यातील वातावरण काही ठिकाणी कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ आहे. कोरडे वातावरण असलेल्या भागात उन्हाची तीव्रता वाढली असून कमाल तापमानात वाढ झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

२९ ते ३० मार्च रोजी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790