नाशिक: दोन दिवस ढगाळ वातावरण, बुधवारपासून थंडीचा कडाका

नाशिकसह मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचाही अंदाज

नाशिक (प्रतिनिधी): बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे आर्द्रता घेऊन महाराष्ट्राकडे वाहत असल्याने नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाले असून रविवार (दि. १२) व सोमवारी (दि. १३) ते कायम राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये शीतगृह उभारणीसाठी महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून देणार – मंत्री उदय सामंत

तसेच काही ठिकाणी हलक्या पावसाचाही अंदाज आहे. दोन दिवसांनंतर हे वातावरण निवळून शीतलहरींमुळे बुधवारपासून (दि. १५) पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790