नाशिक। दि. ७ डिसेंबर २०२५: शहराच्या कमाल-किमान तापमानात चढ-उतार सुरू असून शनिवारी (दि. ६) किमान तापमानाचा पारा ११.५ अंश सेल्सिअसवर स्थिरावला. तसेच कमाल तापमान २७.२ अंश सेल्सिअस इतके मोजण्यात आले. तापमानात वाढ होत असली तरीदेखील वातावरणात गारठा जाणवत आहे.
शुक्रवारी किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते; मात्र तरीही वातावरणात सायंकाळनंतर गारवा जाणवत होता. त्या तुलनेत शनिवारी सकाळी किमान तापमानात ०.५ अंशांनी किंचित घट झाली. तसेच कमाल तापमानसुद्धा १.१ अंश सेल्सिअसने घटले. सायंकाळी पुन्हा थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने हवेत गारठा निर्माण झाला होता.
काही अंशी झालेल्या घसरणीमुळे सायंकाळपासून थंडीची तीव्रता वाढू लागली होती. आज (दि. ७ डिसेंबर २०२५) किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मात्र येत्या दोन दिवसात पुन्हा एकदा थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
![]()

