नाशिकमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज

नाशिक, दि. ६ एप्रिल २०२६: गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हासह अवकाळी पावसाचा सामना करणाऱ्या नाशिककरांना हवामानात काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. शहरातील तापमानात किंचित घट नोंदवली गेली असून उष्णतेचा तीव्रपणा कमी झाल्याचे जाणवत आहे. आज किमान तापमान १७.९°C इतके नोंदवले गेले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही

शनिवारी शहरात कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. त्यानंतर रविवारी तापमानात सुमारे एक अंशाने घसरण होत पारा ३१.५ अंश सेल्सिअसवर आला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. या परिस्थितीमुळे पुढील दोन दिवस शहरात आंशिक ते पूर्णतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

दरम्यान, बदलत्या हवामानामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत असला तरी वातावरणातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790