नाशिक। दि. ३० ऑगस्ट २०२५: नाशिकमध्ये शनिवारी (दि.३०) यलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील पावसाची तीव्रता शनिवारपासून कमी होणार आहे. पुढील पाच ते सहा दिवस राज्यात सर्वदूर मध्यम ते तुरळक पावसाचा अंदाज आहे.
मात्र, मराठवाड्यात शनिवारी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. छत्तीसगड व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता विरले आहे. मोठी कोणतीही हवामान प्रणाली सध्या कार्यरत नाही. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. शुक्रवारी कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पावसाच्या माऱ्यामुळे धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790