🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिकला पावसाचा ‘यलो अलर्ट’ कायम !

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संततधार ते मुसळधार पाऊस कायम होता.

नाशिक। दि. १९ जून २०२५: शहर व परिसरात मागील २४ तासांत ३५.२ मिमी इतका मोसमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असताना संध्याकाळनंतर मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. जोरदार बरसलेल्या या पावसाने रात्री साडेआठपर्यंत २४ तासांत ३५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणीला अटक; १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

हवामान खात्याकडून अद्यापही ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. नाशिक शहर व परिसरात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. सायंकाळनंतर जोरदार पावसाने रस्ते जलमय झाले होते.

🔎 हे वाचलं का?:  शुक्रवारपासून दहावीची परीक्षा

ढगाळ हवामान व सरींचा हलका वर्षाव सुरु होता. सायंकाळनंतर मात्र जोरदार बॅटिंग केली. हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार रात्री उशिरापर्यंत पावसाची जोरदार कायम होती, तर गुरुवारीदेखील पावसाची हजेरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790