नाशिकला आज (दि. १९) पावसाचा ‘यलो अलर्ट’; तापमानात घट, हवामानात बदल

नाशिक, दि. १९ मार्च २०२६ : शहरासह जिल्ह्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला असून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याकडून गुरुवारी नाशिक जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमी झाल्याचे जाणवत असून, कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. शहरात कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भरदिवसा घरफोडीत ६.७४ लाखांचा ऐवज लांबवला

दरम्यान, बुधवारी सायंकाळी नाशिक रोड व वडाळागाव परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येही अवकाळी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने बुधवारी दुपारनंतर वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. दुपारी तीन ते सहा आणि पुन्हा सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता. रात्री आठ वाजल्यानंतर हवामानात अचानक बदल जाणवला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790