नाशिक: कमाल तापमानात घट; उष्णतेची झळ मात्र कायम

नाशिक। दि. १७ मार्च २०२६: शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता जाणवत होती. मात्र मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात घट होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. सोमवारी (दि. १६) शहरातील कमाल तापमान ३४.१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

🔎 हे वाचलं का?:  'फास्टॅग'चा वार्षिक पास २.५% ने वाढला

तापमानात घसरण होत असली तरी रात्रीच्या वेळी वातावरणात उकाड्याची भावना कायम असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. सायंकाळच्या सुमारास मात्र हवेत थोडाफार गारवा जाणवत आहे.

दरम्यान, वाऱ्याचा वेग वाढल्याने दुपारनंतर उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाल्याचे दिसून आले. यापूर्वी ३८ अंशांच्या आसपास पोहोचलेले कमाल तापमान आता खाली आले आहे. तापमानात सुरू झालेल्या या घसरणीमुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू लागला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऋतुरंग भवन मध्ये १९ मार्चला पहाट पाडवा

सोमवारी किमान तापमानातही सुमारे एक अंशाने घट झाली. त्यामुळे येत्या दिवसांत रात्रीच्या उकाड्यातही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790