राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आज (दि. १० जुलै) पावसाचा इशारा !

नाशिक। दि. १० जुलै २०२५: गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात वेगवेगळ्या घटनांमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात १३८ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून आणखी २ दिवस पावसाचा जोर राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, १० जुलैनंतर मराठवाड्यातील पावसाची स्थिती निवळणार, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पूर्व विदर्भात गेल्या २४ तासांत ९५.६ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत २६३.१ मिमी म्हणजेच सरासरी ७२.६२ टक्के पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत सर्वाधिक १३९.६ मिमी पाऊस नागपूर जिल्ह्यात झाला.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

नाशिक, नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार:
नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही भारतीय हवामानशास्त्र विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

जायकवाडी धरणामध्ये ६७.०२ टक्के पाणीसाठा:
जायकवाडीत ५७, ३०७ क्सुसेक पाण्याची आवक सुरू आहे. यामध्ये नांदूर मधमेश्वरमधून १२,६२० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून २,२०५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरणातून ६,९०० भंडारदरा ३,२९० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा ६७.०२ टक्के झाला असून जिवंत पाणीसाठा १४५४.९८९ दलघमी आहे. संबंधित ‘माझं नाशिक’

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गंगापूर धरणाचा विसर्ग ४१3१ क्युसेकने कमी:
गत २४ तासांत पावसाने काहीशी उसंत घेतली असल्याने धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला. तर वाकी आणि मुकणे या दोन धरणांतून विसर्ग बंद करण्यात आला आहे. नाशिककरांचे लक्ष असलेल्या गंगापूर धरणांतून ६१७९ क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग ४१३१ क्यूसेकने घटवून तो बुधवारी (दि. ९) २२०५ क्यूसेक इतका करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

दारणा धरणातून मंगळवारी ८३४८ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता तर ६१७९ क्यूसेकने विसर्ग कमी करण्यात आला असून आता २२०५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्यानंतर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झाली. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३५९१८ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. त्यात २३२९८ क्यूसेकने घट करण्यात आली असून आता १२६२० क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. पालखेड धरणातून ६९६ तर पुणेगाव धरणातून आता ४५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here