नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जून महिन्याच्या पहिल्या आठवड उलटायला आला तरीही वातावरणातील उष्मा कमी होत नसल्याने प्रचंड उकाड्याने नाशिककर हैराण झाले आहेत. तर, कमाल तापमानाचा पाराही सातत्याने ३६ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असल्याने पुन्हा कमाल पारा ४० अंश सेल्सियस पार करतो की काय, अशीच शक्यता निर्माण झाली आहे.
तर किमान तापमानातही कमालीची वाढ झाली असून सातत्याने २४-२५ अंश सेल्सियस राहते आहे. त्यामुळे कमालीची उष्णता आणि उकाड्याने सध्या नाशिककर हैराण झाले असून नाशिककरांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. यंदा गेल्या मार्च महिन्यापासूनच नाशिककरांना उन्हाळ्याची चाहूल लागली. यावेळी नाशिकमध्ये प्रथमच सातत्याने कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियस राहिल्याने कडक उन्हाळा जाणवला आहे.
गेल्या दोन आठवड्यात सातत्याने नाशिकचा कमाल पारा ३६ अंश सेल्सियस राहिला. गेल्या मे महिन्यात अवकाळी पावसामुळे कमाल तापमानात घसरण झाली असली तरीही पारा ३६ अंश सेल्सियसच्या खाली गेलेला नाही. परंतु त्याचवेळी किमान तापमानामध्ये वाढ झाल्याने वातावरणात उष्मा निर्माण होऊन उकाडा वाढला. त्यामुळे दिवसा उन्हाच्या झळा अन् रात्री असह्य असा उकाडा यामुळे नाशिककर पुरते हैराण झाले आहेत.
राज्यातील ‘हॉट’ जिल्ह्यांत नाशिक! पारा चाळिशी पार गेल्याने 10 वर्षांचे ‘रेकॉर्ड ब्रेक’.४२ अंश गाठलेचयंदा नाशिककरांना कडक उन्हाळा सोसावा लागला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेले नाशिक यावेळी मात्र तापले. दरवर्षी कमाल पारा ४० ते ४१ अंश सेल्सियसला पोहोचते. परंतु या दरम्यान कधी स्थिर राहिले नव्हते. यंदा मात्र, सातत्याने कमाल पारा ४० अंशांच्या पुढेच राहिला. २२ मे रोजी सर्वोच्च ४२ अंश सेल्सिसर तापमानाची नोंद झाली आहे.