नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राज्यात १७ व १८ मे रोजी मराठवाडा तसेच नाशिकसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणात दोन दिवस कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
सध्या राज्यात ढगाळ वातावरणासह वादळी वारे वाहत आहेत. १८ मे रोजी नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली, परभणी येथे पावसाची शक्यता असून तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दुपारनंतर मेघगर्जना, वादळवाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सुरगाण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790