नाशिक। दि. १३ सप्टेंबर २०२५: महापालिकेच्या नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक १७ ते २२ या पाच प्रभागांमध्ये रविवारी (दि. १४) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र व चेहडी पंपिंग स्टेशन येथे होणारा एकलहरा येथून वीजपुरवठा बंद केला जाणार आहे त्याचबरोबर स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीनेही जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहे.
त्यामुळे रविवारी सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. परिणामी पाणीपुरवठा देखील बंद राहणार असल्याने प्रभाग क्र. १७ मधील चाडेगांव, एकलहरा रोड, सिन्नर फाटा, गोरेवाडी, चेहेडी गांव, चेहेडी पंपिंग रोड परिसर, सामनगांव रोड, ओढा रोड, प्रभाग क्र. १९ मधील कॅनॉल रोड, चंपानगरी परिसर, शिवरामनगर, दसकगांव, महालक्ष्मीनगर, बालाजीनगर, तिरूपतीनगर, पारिजातनगर, गोसावीनगर परिसर, प्रभाग क्र. १८ मधील पवारवाडी परिसर, जुना सायखेडा रोड, भैरवनाथनगर, जागृतीनगर, अयोध्यानगर, पंचक गांव परिसर, प्रभाग क्र. २१ मधील आनंदनगर, जय भवानी रोड, रोकडोबावाडी, देवळालीगांव, प्रभाग क्र. २२ मधील देवळालीगांव गांवठाण, प्रभाग क्र. २० मधील लोकमान्यनगर, रामनगर, गंधर्वनगरी, आरंभ कॉलेज, कलानगर, ब्रह्मगिरी सोसायटी, भीमनगर व दत्त मंदिर परिसरात दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
![]()

