नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होणार आहे. तत्पूर्वी 85 वर्षांवरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 125- नाशिक पश्चिम मतदारसंघात 84 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 125- नाशिक पश्चिम मतदारसंघात गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी संबंधित भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क करावयाचा होता. त्यानुसार नाशिक पश्चिम मतदारसंघात 94 जणांनी मतदानासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 84 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यासाठी विविध पथके गठित करण्यात आली होती. या पथकांनी वयोवृद्ध मतदारांच्या घरी जावून मतदानाची प्रक्रिया पार पाडली.