
नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ चार दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचाराला जोर चढला असून, सकाळ-संध्याकाळ विविध प्रभाग पिंजून काढले जात आहेत. नाशिक मध्य विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असून, विक्रमी मताधिक्याने त्या विधानसभेत पोहोचतील, असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग क्र. २३ मध्ये दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी सजवलेल्या रथावर उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या समवेत भाजप नेत्या अनिता भामरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे, संध्या कुलकर्णी, शाहीन मिर्झा, उदय जोशी तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. तुलसी आय हॉस्पिटलपासून प्रचार फेरीला प्रारंभ
झाला. हॅपी होम कॉलनी, ईडन गार्डन सोसायटी, बजरंगवाडी, आनंदनगर, अशोका मार्ग, हेमराज कॉलनी, सिद्धमुनी सोसायटी, ईश्वर पॅरेडाइज, बोधले नगर, हिरेनगर, गणेशबाबा समाधी स्थान येथे आल्यावर तेथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आले.
रॅलीचा हा झंझावात पुढे शिवाजीवाडी, विनयनगर, दीपालीनगर, शर्मा मंगल कार्यालय, शिवसृष्टी कॉलनी येथे गेला. मार्गावरील मंदिरात दर्शन, पूजन करण्यात आले. तेव्हा, हिंदुत्वाचा जयजयकार करण्यात आला. घोषणा, प्रचार गाणी व गर्जनेने सर्वत्र आगामी विजयाचे वादळ निर्माण झाले. ठिकठिकाणी महिला, ज्येष्ठ नागरिक, पुरुष व नवमतदार युवकांनी स्वागत केले.
![]()


