नाशिक: कारने येऊन दुचाकी चोरणारा चोरटा गजाआड, दोघे फरार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): कारमध्ये येऊन दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन पकडले असून त्यातील दोघेजण फरार झाले आहेत.

रितेश वसंत सदाफळ (२२, रा. पानमळा, शिर्डी) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. दुचाकीसह विना नंबरची स्विफ्ट डिझायर कार पोलिसांनी हस्तगत केली. दोडी येथे प्रविण शिंदे यांची दुचाकी (एमएच १५ जेएल ६२२०) शुक्रवारी पहाटे चोरुन नेली होती.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सराईत गुन्हेगार वायदंडे (रा. गणेशनगर, ता. राहता) हा साथीदारांसह कारने येऊन दुचाकी चोरी करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सचिन धारणकर, तांत्रिक विश्लेषण तज्ञ हेमंत गिलबिले रवाना झाले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

उमेश वायदंडे कारने लोणी ते शिर्डी एअरपोर्टरोडवर प्रवास करत असल्याची माहिती मिळताच पथकाने परिसरात सापळा रचत कार थांबवली असता कारमधील तिघेजण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी पाठलाग करत रितेश वसंत सदाफळ यास पकडले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

त्याचे साथीदार उमेश वायदंडे, अमोल कुंदे (दोघेही रा. गणेशनगर, ता. राहता) पळून गेले. पोलिसांनी दुचाकीसह विना नंबरची स्विफ्ट कार असा ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत रितेश सदाफळ यास वावी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790