नाशिकहून बंगळुरू, दिल्ली विमान; तयारी अंतिम टप्प्यात

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): आघाडीची एअरलाइन ऑपरेटर म्हणून इंडिगोने नेहमीच नाशिक शहरासाठी सक्षम विमानसेवा दिली असून यामुळे राज्यासह राज्याबाहेरील सेवेची उपलब्धताही वाढली आहे. नाशिकमध्ये काम सुरू केल्यापासून गोवा, अहमदाबाद, इंदूर, हैदराबाद आणि नागपूरसाठी थेट विमानसेवा दिली जात आहे. बंगळुरू आणि दिल्ली या दोन शहरांची सेवा सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ही सेवाही नाशिककरांसाठी सुरू होणार असल्याचे इंडिगोचे सीइओ पीटर अल्बर्स यांनी सांगितले.

इंडिगोकडून मंगळवारी नाशिकमध्ये ‘माय सिटी माय हेरिटेज’ वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अल्बर्स बोलत होते. समवेत इंटग्लोबच्या चेअरपर्सन रोहिणी भाटिया यांसह इंडिगोचे वरिष्ठ अधिकारी, स्टेशन हेड उपस्थित होते.

बंगळुरू आणि दिल्लीनंतर चेन्नइकरीता विमानसेवेची चाचपणी सुरू असून देशांतर्गत जास्तीत जास्त शहरांना नाशिकहून विमानसेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अल्बर्स यांनी‎ यावेळी स्पष्ट केले.

नाशिक‎ विमानतळावरून कंपनीच्या‎ सर्वच सेवांना ८० टक्क्यांपेक्षा ‎जास्त प्रवासी असल्याने सेवा ‎अतिशय उत्तम सुरू‎असल्याचे त्यांनी सांगितले.‎ इंडिगो ही प्रवासी‎ विमानसेवेसाठी प्रसिद्ध असून‎ कार्गो सेवा येथून सुरू‎ करण्याबाबत सध्या काही ‎नियोजन नाही. दिल्ली सेवा‎सुरू झाल्यानंतर‎ नाशिककरांना आंतरराष्ट्रीय‎ सेवेसाठीचा कनेक्ट सहज‎सुलभ होणार असल्याचेही‎ त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चेन्नईसाठी चाचपणी:
बंगळुरू आणि दिल्लीनंतर चेन्नईसाठी विमानसेवेची चाचपणी सुरू असून देशांतर्गत जास्तीत जास्त शहरांना नाशिकहून विमानसेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. -पीटर अल्बर्स, सीइओ, इंडिगो

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here