नाशिक: टँकरचालकांचा संप; सर्वच पेट्रोलपंपांवर लागल्या रांगा; बाजारपेठेवरही परिणाम !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): ‘हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संपाची हाक देताच शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प झाला. जवळपास ७० टक्के ट्रकचालक नियोजित संपाच्या आदल्या दिवशीच म्हणजे सोमवारी संपात उतरले.

त्यामुळे आडगाव येथील ट्रक टर्मिनसवर शेकडो ट्रक रांगेत उभे होते. इंधन भरण्यासाठी सायंकाळी सहा वाजल्यानंतर पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा दिसून आल्या. जवळपास २५ ते ३० टक्के पेट्रोल पंपांवर तर इंधन संपल्याने बंदचे फलक झळकले.

मनमाड येथील पाणेवाडीतील इंधन प्रकल्पावर इंधन भरणारे जवळपास ५० ट्रक तेथे पोहोचलेच नाहीत. त्यामुळे सायंकाळनंतर अनेक पेट्रोलपंप बंद दिसून आले. मालेगाव स्टॅण्ड, त्र्यंबक नाका आदी ठिकाणचे पंप बंद होते, तर त्र्यंबक नाक्यावर चर्चच्या पाठीमागील पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी रांग दिसून आली.

हे ही वाचा:  नाशिक: छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

मंगळवारपासून (दि. २) ट्रक चालकांचे बंद आंदोलन होणार असल्याची वाता शहरात वाऱ्यासारखी पसरली अन त्याचा परिणाम पेट्रोल पंपांवर दिसून आला.

आंदोलनानंतर काही तासांतच शहरातील एकूण ११० पेट्रोलपंपांपैकी १० टक्के पेट्रोलपंपांवर इंधनाचा खडखडाट झाला होता. ट्रक चालकांचा संप ताणला गेला तर आजही (दि. २) इंधन टंचाईची झळ जाणवणार असल्याने वाहनचालकांनी वाहनांच्या टाक्या सोमवारीच फुल करून घेण्यासाठी उर्वरित पेट्रोलपंपांवर दिवसभर रांगा लावल्या होत्या.

हे ही वाचा:  नाशिक: शेल्टर 2024:9000 कुटुंबांनी दिली प्रदर्शनास भेट; 60 कुटुंबांची झाली गृह स्वप्नपूर्ती

मनमाडच्या पानेवाडीतील भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांच्या डेपोतून ट्रकचालकांनी संप पुकारत तसेच वितरकांचे २५० हून अधिक टैंकरही रोखून घरल्याने जिल्हाभरात इंधन टंचाईच्या झळा सोमवारी (दि. १) दुपारनंतर जाणवायला लागल्या. शहरात तिन्ही कंपन्यांचे मिळून ११० पेट्रोलपंप असून प्रत्येक पंपाची सरासरी २५०० लिटर पेट्रोल आणि जवळपास तितक्याच लिटर डिझेलची मागणी रोज भागविली जाते.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

ट्रकचालकांच्या या आंदोलनामुळे या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या डेपोमधून सोमवारी सायंकाळपर्यंत एकही टैंकर इंधन भरून बाहेर पडलेला नव्हता. यामुळे शहरातील किमान १० टक्के पेट्रोलपंपांवरील दुपारनंतर संपले होते. इंधन मिळणार इंधन नाही या भीतीने वाहनचालकांनी पेट्रोलपंपांवररांगा लावल्या होत्या. जर हीच परिस्थिती कायम राहीली तर मात्र इधन टंचाईच्या झळा मंगळवारी (दि. २) दुपारनंतर शहरात दिसून येण्याची शक्यता नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रो डीलर्स वेल्फेअर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790