नाशिक: 3.5 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण: 2 दिवसांत 1.5 लाखाचे उद्दिष्ट‎

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात ‎‎आठवडाभरात शहरातील तीन लाख ५३ ‎‎हजार ९७८ कुटुंबांचे ‘इम्पेरिकल डेटा’ ‎‎सर्वेक्षण झाले असून आता येत्या दोन ‎‎दिवसांत दीड लाख कुटुंबांचे सर्वेक्षण ‎‎करण्याचे आव्हान प्रगणक, पर्यवेक्षक व ‎‎प्रभाग अधिकाऱ्यांवर आहे.‎

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ‎‎मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या ‎‎आंदोलनाची जरी सांगता झाली असली ‎तरी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली‎ शहरी भागात महापालिकेवर इम्पेरिकल‎डेटा संकलित करण्याची मोहीम सुरू‎आहे. त्यासाठी पालिकेचे २५९९‎कर्मचारी प्रगणक काम करीत आहे. ‎महापालिका हद्दीतील जवळपास पाच‎लाख १३ हजार मिळकती असून, या‎ प्रत्येक घरात जाऊन हे सर्वेक्षण होत ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आहे.‎

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

गेल्या आठवड्यापासून हे सर्वेक्षण सुरू‎झाले असून सोमवारी (दि. २९)‎सायंकाळपर्यंत शहरातील तीन लाख ५३‎हजार ९७८ कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सर्वेक्षणाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक‎ असून या दोन दिवसांत सुमारे दीड लाख‎ कुटुंबांचे सर्वेक्षण कसे होणार अशी‎ चिंता आता पालिकेचे कर्मचारी व‎अधिकारीच व्यक्त करत आहेत.‎

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या‎सर्वेक्षणात विविध तांत्रिक अडचणी ‎येत असताना आता उच्चभ्रू वस्त्यांमध्ये‎प्रगणकांना प्रवेशही मिळत नसल्याची‎बाब डोकेदुखी ठरत आहे.‎ कर्मचाऱ्यांना संबंधितांकडून प्रश्नांची‎उत्तरे देण्यास टाळाटाळ केली जात‎आहे. यामुळे नवीनच समस्या या‎कर्मचाऱ्यांपुढे उभी राहिली आहे.‎

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

विभाग सर्वेक्षण झालेली कुटुंबे‎

सातपूर: ५३,०२९‎, नाशिक पश्चिम: ३३,५००‎, नाशिक पूर्व: ६९,४४९‎, पंचवटी: ७०,०००‎, नाशिकरोड: ५०,४००‎.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790