नाशिकच्या विद्यार्थ्याचा रशियात मृत्यू; डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरे…

नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड येथील हुशार, अष्टपैलू विद्यार्थी अभिषेक युवराज जाधव (वय २१) याचा रशियात टॅक्सी व ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. डॉक्टर बनण्यासाठी रशियात गेलेला अभिषेक एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. अभिषेकचे वडील महापालिकेत कर्मचारी आहेत.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

नेमकं काय घडलं?:
रशियात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेला अभिषेक गणेशोत्सवासाठी जेलरोडला आपल्या घरी आला होता. मंगळवारी (दि. १०) पहाटे तो विमानाने रशियाला गेला. विमानतळावरून अभिषेक व चार मित्र टॅक्सीने वसतिगृहाकडे जात होते. वसतिगृहाजवळ पोहचत असतानाच रस्त्याच्या बाजूला मोठ्या इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाजवळ एका ट्रकने त्यांच्या टॅक्सीला धडक दिली.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

काही तरी अडथळा आल्याने हा ट्रक अचानक रस्त्यावर आला व टॅक्सीला जाऊन धडकला. अभिषेक कारमध्ये चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेला होता. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अन्य मित्र जखमी झाले आहेत. अभिषेकचे पार्थिव आज, गुरुवारी (दि. १२) सायंकाळपर्यंत दिल्लीहून मुंबईत व नंतर नाशिकला आणण्यात येणार आहे. भारतीय दूतवास त्यासाठी मदत करीत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790