
नाशिक : इंडियन कनो-कायकिंग (नौकानयन) असोसिएशन, महाराष्ट्र कनो-कायकिंग असोसिएशन व सांगली जिल्हा कनो-कायकिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने १६वी महाराष्ट्र राज्य कनो-कायकिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२५ नुकतीच जत (सांगली) येथे यशस्वीपणे पार पडली.
या राज्यस्तरीय स्पर्धेत विल्होळी येथील स्वाभिमान बोट क्लबच्या खेळाडूंनी यश प्राप्त केले. क्लबच्या खेळाडूंनी सुवर्ण, २ रौप्य आणि ५ कांस्यपदकांची लक्षणीय कमाई केली. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वांनी अभिनंदन केले. उपाध्यक्ष प्रताप जामदार, राष्ट्रीय सहसचिव दत्ता पाटील, सचिव सुरेंद्र कोरे, तसेच हेमंत पाटील यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
स्वाभिमान बोट क्लबचे अध्यक्ष सदानंद नवले यांनी आपल्या खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय खेळाडू तुकाराम डांगे आणि वैभव नवले यांचे मार्गदर्शन लाभले. नाशिक जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष वाळू नवले, सरपंच जानकूबाई चव्हाण, उपसरपंच भास्कर थोरात, ज्येष्ठ कुस्तीगीर सावळाराम डांगे यांनी खेळाडूंचा सत्कार केला.