नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पोलीस स्टेशनला दाखल होणारे सर्व गुन्हे, आरोपी यासह सर्व पोलिस कामकाजाची माहिती संगणकीय यंत्रणेत भरून ती जतन करण्यासाठी सन २०१५ पासून सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स्) ही यंत्रणा देश पातळीवर सुरू करण्यात आली आहे…
राज्यभरातील पोलीस घटकांकडून चालणारे सीसीटीएनएस कामकाजाचे (CCTNS Functioning) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (State Crime Investigation Department) दरमहा परीक्षण केले जाते. जुलै २०२३ या महिन्याच्या मूल्यमापनात नाशिक ग्रामीण घटक प्रथम क्रमांकावर आला होता. नुकतेच ऑगस्ट २०२३ चे मूल्यमापन जाहीर झाले असून यातही नाशिक ग्रामीण घटकास अव्वल स्थान मिळाले आहे. याप्रमाणे नाशिक ग्रामीण घटकाने सीसीटीएनएस मधील मूल्यांकनात प्रथम येण्याचा मान सलग दुसर्यांदा मिळविला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी सीसीटीएनएस शाखा कार्यरत असून या शाखेत काम करणार्या महिला अंमलदार सिमा उगलमुगले, ज्योती आहिरे, प्रतिभा शिंदे व कविता भोर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सत्कार केला.