🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त ! ग्रामीण पोलिसांची कारवाई

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुप, नाशिक
नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुटखा कार्यवाई करत तब्बल १ कोटी २४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. राजस्थानहून नाशिककडे दोन कंटेनर अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री करंजखेड परिसरात सापळा रचून पोलिसांनी २ कंटेनर ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता मिराज कंपनीचा प्रतीबंधीत गुटखा पोलिसांना मिळून आला.

महेंद्रसिंह सोलंकी, श्यामसिंह राव, अर्जुनसिंह राणावत आणि लोगलजी मेहवाल या सर्व राजस्थानच्या चौघांना वणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे,त्यांच्याकडून एकूण १ कोटी ६४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, अधिक तपास नाशिक ग्रामीण पोलिस करताहेत. 

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790