नाशिक (प्रतिनिधी): प्रादेशिक परिवहन विभागात बदलीसाठी ३०० कोटींचा अप’हार झाल्याची तक्रार इ-मेलद्वारे तक्रार देणारे नि’लंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांच्यासह परिवहन मंत्रालयातील सचिव प्रकाश साबळे आणि अवर सचिव डी. एच. कदम यांची मंगळवारी (दि. १) सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यात आली. बुधवारी (दि. २) तक्रारदारासह अधिकाऱ्यांची पुन्हा चौकशी केली जाणार असल्याची माहिती चौकशी अधिकारी उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी इ-मेलद्वारे शहर पोलिसांना प्रादेशिक परिवहन विभागात बदल्यांसाठी भ्र’ष्टाचार सुरू असून यामध्ये ३०० कोटींचा अ’पहार झाला असल्याची व त्यात परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. या अर्जाची दखल घेत पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी गु’न्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना तक्रार अर्जामधील नमूद अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चार दिवसांपूर्वी शाखेच्या कार्यालयात परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, उपपरिवहन आयुक्त जितेंद्र कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, वर्धा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, यांची चौकशी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच आरटीओमध्ये कार्यरत असलेल्या काही एजंटांचेदेखील लागेबांधे असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांचीही चौकशी केली जाणार असून त्याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, असेदेखील तपासी पोलिस अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तक्रारदार निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांची सकाळी उपायुक्त कार्यालयात चौकशी करण्यात आली. याचबरोबर मंत्रालयाचे सचिव प्रकाश साबळे, अवर सचिव डी. एच. कदम हेदेखील चौकशीसाठी उपस्थित होते. तक्रारदार आणि दोन्ही अधिकारी एकमेकांसमोर आले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला ओळखत नसल्याचे सांगत सर्व आरोपांचे खंडन केले असल्याची माहिती मिळाली आहे.